Bookstruck

जयपुरचे राजघराणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

भारताच्या स्वातंत्र्यानंतर सगळे राजे आणि संस्थानिक यांच्या राज्यांचे विलिनीकरण झाले.  जयपुरचे राजघराणे मात्र आपले स्थान आणि मानमरातब टिकवुन होते. महाराजा भवानी सिंग हे जयपुरच्या गादीचे शेवटचे नामधारी वारसदार होते. त्यांना पुत्र नसल्याने आपल्या उतारवयात त्यांची मुलगी दियाकुमारीच्या मुलाला दत्तक घेतले. त्यांचा नातु राजकुमार पद्मनाभ हा २०११ साली महाराजा भवानी सिंग यांचा दत्तक पुत्र झाला.

हा तरुण राजपुत्र आता जयपुरच्या गादीचा महाराज झाला होता. महाराज पद्मनाभ राष्ट्रिय पोलोपटु आहेत. या खेळासाठी भारतात अजुन जागरुकता पसरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या राजघराण्याने आपला रामबागचा महाल ताज ग्रुप ऑफ हॉटलस् यांना भाडेतत्त्वावर दिला आहे. महाराजा पद्मनाभ यांनी एअरबीएनबी या कंपनीशी पार्टनरशीप केली आहे. या पार्टनरशीपच्या अंतर्गत पर्यटकांना जयपुर सिटी महालातील एक आलिशान खोली(स्वुईट) राहण्यासाठी देतात. पर्यटक त्यामुळे राजेशाही आयुष्य अनुभवु शकतात. यातुन आलेले सगळे उत्पन्न राजकुमारी दिया कुमारी फाऊंडेशनला जाते.

सळसळत्या तरुण रक्ताचे महाराज पद्मनाभ यांना प्रवासाची विशेष आवड आहे. त्यांचा फोटो जगाभरातील अनेक मासिकांच्या मुखपृष्ठवर छापण्यात आला आहे. टाईमस् ऑफ इंडियाच्या बातमीनुसार या जयपुर राजघराण्याचा एकुण डौलारा २.८ बिलियन डॉलर आहे.

« PreviousChapter ListNext »