Bookstruck

जोधपुरचे राठोड राजघराणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकेकाळी राठोड राजपरिवार जयपुरवर राज्य करीत होते. राठोड राजघराण्याचे वंशज आजही तिथे राहतात. जोधपुर येथे मेहरनगड किल्ला आणि उमीद भवन पॅलेस आहेत. राठोड राजपरिवाराचे हे घर जगातील काही मोठ्या खाजगी निवासस्थानांच्या रांगेत येते. आता महाराज गज सिंग हे उमीद भवन पॅलेस मध्ये सहपरिवार राहतात. तेथे महाराजा गज सिंग, त्यांची पत्नी सह त्यांची दोन मुले आणि सुना असे कुटुंब राहाते. या पॅलेसचा काही भाग हा पर्यटकांसाठी खुला केला आहे.

थोडा भाग ताज ग्रुप ऑफ हॉटेलस् या परिवाराशी पार्टनरशीपमध्ये सांभाळतात. हे ठिकाण डेस्टिनेशन वेडिंगसाठी पहिल्या पसंतीत येते. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह याच पॅलेसमध्ये झाला. महाराज गज सिंग हे राज्यसभेचे सदस्य होते. वारसा जपत व्यवसाय करणारे असे जोधपुरचे राठोड घराणे.

« PreviousChapter ListNext »