Bookstruck

आमदार हसन 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘चला.’

सासरे-जावई बाहेर गेले. फातमाने चित्राची खोली उघडली. चित्राने मंगल स्नान केले होते. सुंदर रेशमी साडी ती नेसली होती. फातमाने नवी आणून दिली होती. केसांत फुले होती. फातमाने प्रेमात घातली होती. चित्राचे मुख प्रसन्न दिसत होते.

‘चित्रा, चल बाहेर, आपण जाऊन दोघी बोलत बसू.’

‘चल.’

दोघीजणी बाहेर येऊन बसल्या. एका टेबलाभोवती चार खुर्च्या होत्या. टेबलावर ताटे होती.

‘फातमा, आता येथून केव्हा जाऊ?’

‘बाबांबरोबर जा. ते सारे करतील.’

‘फातमा, तुझे उपकार! तुझ्या मोलकरणीचे उपकार!’

‘चित्रा, प्रेमाला उपकार शब्द नको लावू.’

इतक्यात खाली मोटार वाजली.

‘आले वाटते?’ चित्रा म्हणाली.

फातमा उठली. तिने दार उघडले. दिलावर व आमदारसाहेब आले होते.

‘आली का ग तुझी मैत्रीण?’ आमदारांनी विचारले.

‘हो बाबा, तुम्ही गेलेत नि ती आली. चला, तुमची ओळख करून देते.’

फातमा आली. कोट वगैरे काढून आमदारसाहेब आले. दिलावर आला. त्यांनी हातपाय धुतले. फातमाने टॉवेल दिला.

‘ही का तुझी मैत्रिण?’ आमदारांनी विचारले.

‘हो.’ फातमा म्हणाली.

‘चित्रा, हे माझे बाबा! मी सांगत असे ना तुला त्यांच्याविषयी! आणि हे दुसरे कोण? ओळख!’

‘तुझे यजमान.’

‘होय. यांचे नाव दिलावर.’

‘यांचे नाव मी रहीम ठेवले आहे.’ चित्रा म्हणाली.

‘वा! छान नाव आहे.’ आमदारसाहेब म्हणाले. रहीम नाव ऐकून दिलावर काळवंडला. तो काही खाईना; तसाच तो स्वस्थ बसला.

‘दिलावर, तुम्ही हातसे धरून?’ भाजी फक्कड झाली आहे! फातमा, तुझ्या मैत्रिणीस श्रीखंड वाढ की!’

« PreviousChapter ListNext »